चंद्रयान करिता साहित्य बारामतीतून जाणे हे अभिमानास्पद बाब – MP Supriya Sule

चंद्रयानवर अधिवेशनात चर्चेदरम्यान एकही कॅबिनेट दर्जाचा मंत्री उपस्थित नसल्याने खंत

MP Supriya Sule – चंद्रयान-३ (Chandrayaan-3) च्या यशस्वीते नंतर आज संसदेत विशेष अधिवेशनात चर्चा करण्यात आली. या यशस्वी उड्डानंतर जगभरात भारताचे नाव नव्याने उज्वल झाले आहे. चंद्रयान २ आणि चंद्रयान ३ या मोहिमेकरिता इलेक्ट्रिक पार्ट आणि इतर साहित्य बारामती येथील कंपनीच्या वतीने पुरवण्यात आले होते. ही पुणे जिल्ह्यासाठी आणि बारामतीसाठी मोठी अभिमानास्पद बाब आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये चर्चेदरम्यान स्पष्ट केले आहे.

लोकसभेमध्ये सुरू असलेल्या विशेष अधिवेशनात आज चंद्रयान मोहिमेबाबत (Mission Chandrayaan) प्रस्तावावर चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेदरम्यान सभागृहांमध्ये कॅबिनेट मंत्री या महत्त्वपूर्ण चर्चेदरम्यान उपस्थित राहत नाहीत, ही निंदनीय बाब आहे. एकही कॅबिनेट दर्जाचा मंत्री उपस्थित नसावा याबद्दल तीव्र शब्दात खेद ही व्यक्त केला. तसेच सभापतींनी मंत्र्यांना रोलिंग द्यावा असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आहे.

खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, चंद्रयान २-३ यशस्वी उड्डाणाबद्दल सर्व सहभागी शास्त्रज्ञांचे अभिनंदन सुप्रियाताई सुळे यांच्या कडून करण्यात आले. एक भारतीय म्हणून आजचा हा दिवस आपल्यासाठी फारच अभिमानास्पद आहे. मला अभिमान आहे की, मी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती या मतदारसंघातून निवडून येते. आज त्या मतदार क्षेत्रातील काही कंपन्यांनी चंद्रयान दोनच्या यशस्वी उड्डाणामध्ये मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आहे. त्यामध्ये वालचंद हिराचंद यांची १०० वर्षांपूर्वी सुरु केलेल्या कारखान्यातून या चंद्रयानाचे काही भाग बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर माझ्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे, की व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे भानुदास भोसले, सुजाता भोसले, संदीप चव्हाण यांनी बनवलेली इलेक्ट्रॉनिक चीप यामध्ये बसवलेली आहे.

सुप्रियाताई सुळे यावर सविस्तर बोलताना म्हणाल्या की ,माझ्या बारामती मतदार संघात अप्रतिम काम करणाऱ्या इतरही काही कंपन्या आहेत. जसे की, हायड्रोजन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर, टाटा महिंद्रा या सर्वांचाच भारतीय विकासातील योगदान मोठ्या मोलाचे आहे. भारतीय म्हणून आपल्याला एका समृद्ध परंपरेचा वारसा आहे. ज्याचा भारतीय म्हणून आपल्याला अभिमान असायलाच हवा. भारताला ज्याचा अभिमान आहे. त्या गणित, पौराणिक कथा आणि खगोलशास्त्र या परंपरा आपल्याला विसरता कामा नये. या भारतातील शास्त्रज्ञांचे त्याचबरोबर या चंद्रयानामध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या लोकसभा क्षेत्रातील सर्व अभियंत्याचे मी मनापासून अभिनंदन करते. असेही यावेळी सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-