‘दगडूशेठ’ बाप्पांसमोर ३६ हजार महिलांनी केले सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ ; महाराष्ट्रातून आलेल्या महिलांच्या गर्दीचा उच्चांक

Dagdusheth Ganpati : ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि… असे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, महिलांनी केलेला शंखनाद आणि मोरया मोरयाच्या जयघोषाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात ३६ हजार महिलांनी सामुदायिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण केले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर झालेल्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमी निमित्त पहाटे ३६ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, अमर कोद्रे, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने, विलास रासकर, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव यांसह विश्वस्त व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

रशिया व थायलंड येथून आलेल्या परदेशी भक्तांनी देखील यावेळी सहभाग घेतला. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा ३६ वे वर्ष होते. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. तसेच हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले. मोबाईलचा टॉर्च उंचावून देखील महिलांनी गणरायाचा जयघोष केला.

पहिले २० महिलांचे पथक पहाटे २ वाजता उपस्थित झाले. तेव्हापासूनच महाराष्ट्रभरातून उपक्रमास आलेल्या महिलांची येथे येण्यास सुरुवात झाली. पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकाच्या पुढेपर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता. गणेशोत्सवाचा गौरव वाढविणारा हा कार्यक्रम असल्याची भावना उपस्थित मान्यवर आणि महिलांनी यावेळी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या-

Virat Kohali : देशभक्त विराट कोहलीने त्याच्या आवडत्या गायकाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले, जाणून घ्या नेमके कारण …

Anand Mahindra : आनंद महिंद्रांकडून भारतीय गोलंदाज सिराजसाठी पाठवली ग्रेटभेट

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही फूट नाही! शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची नवी दिल्लीत भेट

राज ठाकरे जेव्हा मुकेश अंबानी यांच्या घरी पोहोचतात, भेटीमागचं कारण तर आहे अतिशय खास