“गोपीचंद पडळकरांना काळं फासा अन् एक लाख मिळवा”, जाणून घ्या कुणी केलीय ही घोषणा

Gopichand Padalkar – भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना जोडे मारा, काळं फासा आणि एक लाख रुपये मिळवा, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी राज्यातील अजीत पवार (Ajit Pawar) गटाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. इतकेच नाहीतर गोपीचंद पडळकर नागपूरात आले तर आम्ही सोडणार नाही, पडळकर नागपूरात आले तर मार खाऊन जाणार, असा थेट इशाराच प्रशांत पवार (Prashant Pawar) यांनी पडळकर यांना दिलाय.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख ‘लांडगा’ असा केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर अजित पवार यांचा देखील गट आक्रमक झाला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, पडळकरांची जागा दाखवल्याशिवाय ते सुधारणार नाहीत. नागपूरला आल्यावर पडळकरांना सोडणार नाही. पडळकरांनी नागपूरला येऊ नये. आल्यावर मार खाल्याशिवाय जाणार नाहीत.

पडळकरांचं वक्तव्य काय?
धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे, असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-

Virat Kohali : देशभक्त विराट कोहलीने त्याच्या आवडत्या गायकाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले, जाणून घ्या नेमके कारण …

Anand Mahindra : आनंद महिंद्रांकडून भारतीय गोलंदाज सिराजसाठी पाठवली ग्रेटभेट

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही फूट नाही! शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची नवी दिल्लीत भेट

राज ठाकरे जेव्हा मुकेश अंबानी यांच्या घरी पोहोचतात, भेटीमागचं कारण तर आहे अतिशय खास