राज ठाकरे जेव्हा मुकेश अंबानी यांच्या घरी पोहोचतात, भेटीमागचं कारण तर आहे अतिशय खास

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीचा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. जो प्रत्येक भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी साजरा केला जातो आणि या वर्षी तो आज म्हणजेच 19 सप्टेंबर 2023, मंगळवारी साजरा केला जाईल. हा 10 दिवसांचा गणोत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण आपापल्या घरी गणपतीचे स्वागत करतात आणि त्याची मूर्ती बसवतात.

देशाचे सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालंय. त्यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे कुटुंबासह गेले. राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुकेश अंबानी यांच्या भेटीचा फोटो समोर आलाय.

मुकेश अंबानी यांच्या ‘एंटीलिया’ या निवासस्थानी आज गणपती बाप्पाचं आगमन झालंय. गणपतीच्या आगमनाच्या निमित्ताने अंबानींच्या ‘एंटीलिया’ बंगल्यात चांगलीच लगबग बघायला मिळाली. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे हे देखील अंबानींच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला गेले होते.

महत्त्वाच्या बातम्या-
Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाची आतुरता संपली! पाहा गणपती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि साहित्य यादी

Ganesh Utsav 2023: भगवान गणेशाच्या ‘या’ १२ अवतारांचे आहे खास महत्त्व, वाचा बाप्पांबद्दल खास गोष्टी

Ganesh Chaturthi 2023: अशा प्रकारे घरी बनवा गणपतीचा आवडता मोदक, सर्व इच्छा होतील पूर्ण!