हद्द झाली : उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करताना उपमुख्यमंत्र्यांच्या आडनावातच केला घोळ  

ठाणे – शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 अशा फरकाने जिंकल्यानंतर  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी (Deputy CM Devendra Fadnavis) विराजमान झाले. त्यानंतर अनेकांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकावले.अशातच मीरा भाईंदरमध्ये भाजप समर्थकांनीही बॅनरबाजी केली होती. पण ही बॅनरबाजी चांगलीच चर्चेत आली आहे. कारण या बॅनरमध्ये (Devendra Fadnavis News) देवेंद्र फडणवीस यांचं नाव छापतानाच मोठा घोळ झाला आहे.

मीरा रोडच्या शांतीनगर येथील जैन मंदिर परिसरात लावलेला बा बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फर्नांडिस (Devendra Fernandes Poster) असा करण्यात आला होता. स्वीकृत नगरसेवक विक्रम प्रतापसिंह यांनी फडणवीसांना शुभेच्छा देताना त्यांचं आडनाव फडणवीस ऐवजी फर्नांडिस केल्यानं हा बॅनर चर्चेचा विषय ठरलाय.