मासिकातून भारतीय मुस्लिमांना जिहादसाठी चिथावणी देणारा दहशतवादी संघटना आयएसचा मोठा कट

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने त्यांच्या व्हॉईस ऑफ खुरासान मासिकाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. खोरासान नावाच्या प्रोपगंडा मासिकाच्या या आवृत्तीत आयएसने नूह हिंसा आणि ज्ञानवापी मशीद प्रकरणावर लेख लिहून भारतीय मुस्लिमांना जिहादसाठी भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांचेही नाव या मासिकात टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.

मासिकात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्याबद्दल असभ्य भाषा वापरण्यात आली आहे. सोशल मीडिया आणि टेलिग्रामच्या माध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या आयएस मॅगझिनवर एनआयए सातत्याने कडक कारवाई करत आहे. इस्लामिक स्टेट मॅगझिन व्हॉइस ऑफ खुरासानच्या कव्हर पेजवर नूहमध्ये चालवलेल्या बुलडोझरचा फोटो वापरला आहे.

मासिकात मोनू मानेसर आणि बिट्टू बजरंगी यांचा उल्लेख

मोनू मानेसर आणि बिट्टू बजरंगीचा संदर्भ देत मासिकात लिहिले आहे की, या लोकांनी एक भडकावणारा व्हिडिओ बनवला, त्यानंतर मुस्लिमांवर हल्ला करण्यात आला. मुस्लिमांची 500 घरे तोडण्यात आली, जाळण्यात आली, याला हरियाणाच्या गृहमंत्र्यांनी पाठिंबा दिला.

विशेष म्हणजे देशातील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा जोरदार मोहीम राबवत आहेत, त्यामुळे दहशतवादी संघटना खवळल्या आहेत आणि हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, जवानांच्या तत्परतेमुळे दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.