दाक्षिणात्य अभिनेत्याने वयाच्या ६०व्या वर्षी केले चौथे लग्न, सुपरस्टार महेश बाबूशी जवळचे नाते

दाक्षिणात्य अभिनेते नरेश बाबू यांनी (Naresh Babu) चौथे लग्न केले आहे. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी 44 वर्षीय अभिनेत्री पवित्रा लोकेशला आपला जोडीदार बनवले आहे. नरेश बाबूंचे लग्न (Naresh Babu Fourth Wedding) अगदी साधेपणाने झाले आणि त्यात फक्त कुटुंब आणि मोजके मित्र उपस्थित होते. लग्नाचा व्हिडिओ नरेश बाबू यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना नरेश बाबू यांनी लिहिले की, “आमच्या या नवीन प्रवासात आयुष्यभर शांती आणि आनंद मिळावा यासाठी तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.” व्हिडिओमध्ये नरेश बाबू आणि पवित्र लोकेश मंडपात दिसत आहेत आणि लग्नाचे विधी करताना दिसत आहेत. मंडपाभोवती अनेक पाहुणेही दिसतात. नरेश हे साऊथचा सुपरस्टार महेश बाबूचे सावत्र भाऊ आहेत.

दरम्यान पवित्रासोबत लग्न करण्यापूर्वी नरेश यांनी तीन लग्न केले आहेत. त्यांचे पहिले लग्न ज्येष्ठ डान्स मास्टर श्रीनू यांच्या मुलीसोबत झाले होते. त्या लग्नापासून दोघांना नवीन विजयकृष्ण नावाचा मुलगा झाला. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध कवी आणि गीतकार देवुलपल्ली कृष्ण शास्त्री यांची नात रेखा सुप्रिया हिच्याशी विवाह केला. यानंतर त्यांनी आपल्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या रम्या रघुपतीशी लग्न केले. या लग्नापासून नरेश आणि रम्याला एक मुलगा आहे.