पाटील आडनाव लावून पाटलांची बदनामी करतेय म्हणणाऱ्या मराठा संघटनेला गौतमीने ठणकावून सांगितलं, म्हणाली…

नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आडनावाविषयी (Gautami Patil Surname) नवी माहिती समोर आली आहे. गौतमीच्या आडनावावरून पुण्यात चक्क बैठक पार पडली आहे. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे गौतमीच्या आडनावावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

त्यावर गौतमी पाटील हिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या प्रतिक्रियेद्वारे आपण मागे हटणार नसल्याचे गौतमीने स्पष्ट केले आहे.

मराठा संघटनेला सडेतोड उत्तर देताना गौतमी म्हणाली, मी पाटीलच आहे आणि हे नाव मी वापरणारच असे गौतमीने ठामपणे म्हटले आहे. विरार येथील खार्डी गावात आज गुरुवारी सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्याबद्दल कोणी काहीही बोलले तरी मला काही फरत पडत नाही. मी जे कार्यक्रम करते ते सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. माझे हे कार्यक्रम चांगले पार पडत आले आहेत, असे गौतमीने म्हटले आहे.

गौतमीने यावेळी आपल्या टीकाकारांना आवाहनही केले आहे. माझ्या कार्यक्रमावरून ज्या कोणाला प्रश्न असतील त्यांनी माझा कार्यक्रम पाहायला यावे आणि माझा कार्यक्रम त्यांनी पूर्ण पाहावा, असे गौतमी पाटील म्हणाली.