Shirur LokSabha | अमोल कोल्हे गेल्या पाच वर्षांतील कामाचा हिशोब द्या; शिरुरच्या चौकात झळकले बॅनर्स

गेल्या काही दिवसापासून शिरूरमधील राजकीय (Shirur LokSabha) वातावरण चांगलचं तापलं आहे. 2019 आली आढळराव पाटील यांचा पराभव करत अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा (Shirur LokSabha) मतदारसंघात विजय मिळवला होता. मात्र खासदार झाल्यानंतर कोल्हे हे मतदारसंघात लोकांपासून दूर झाले, गेल्या पाच वर्षात बहुतांश गावांमध्ये ते फिरकलेच नाहीत, असा आरोप केला जात आहे. आज शिरूर शहरामध्ये अनेक चौकांत कोल्हे यांना प्रश्न विचारणारे बॅनर्स झळकले आहेत. “आम्हा शिरुरकरांची मागणी आहे. तुम्ही पाच वर्षात शिरुर शहरासाठी काय केले? कृपा करुन सांगा?” असा मजकूर संबंधित बॅनर्सवर छापण्यात आला आहे.

दरम्यान, “कोल्हे साहेब पाच वर्षात तुम्ही दुसऱ्यांदा शिरुर शहरात मत मागायला आले, पण शिरुर शहरातल्या लोकांना पाच वर्षात एक रुपयाचा तुम्ही निधी दिला नाही, आम्ही कस काय मतदान करणार तुम्हाला ते सांगा?” अशा आशयाचे बॅनर देखील अनेक ठिकाणी झळकले आहेत. संबंधित बॅनरच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांना गेल्या पाच वर्षातील कामांचा हिशोब मागितला जात आहे. तसेच निवडून आल्यानंतर मतदार संघात फिरकले नसल्याचा सवालही केला जात आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा