पंतप्रधान मोदींच्या भावानेच केला केंद्र सरकारचा केला निषेध, जाणून घ्या काय आहे मागणी 

 नवी दिल्ली-  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे भाऊ आणि ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे (एआयएफपीएसडीएफ) उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) यांनी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी दिल्लीत धरणे आंदोलन केले. प्रल्हाद मोदी आणि इतर AIFPSDF सदस्य जंतरमंतरवर जमले आणि घोषणाबाजी केली.

एआयएफपीएसडीएफचे राष्ट्रीय सरचिटणीस विश्वंभर बसू यांनी पीटीआयला सांगितले की ते त्यांच्या 9 कलमी मागण्यांशी संबंधित एक निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करणारआहेत. ते म्हणाले की आम्ही बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याचा विचार करत आहोत.

AIFPSDF तांदूळ, गहू आणि साखर तसेच रास्त भाव दुकानांमधून विकले जाणारे खाद्यतेल आणि कडधान्ये यांच्या नुकसानीची भरपाई मागत आहे. मोफत वितरणाचे ‘पश्चिम बंगालरेशन मॉडेल’ देशभरात लागू केले जावे, अशीही त्यांची मागणी आहे.बसू म्हणाले की, खाद्यतेल, डाळी आणि एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा रास्त भाव दुकानांतून करावा, अशी आमची मागणी आहे. ग्रामीण भागातील रास्त भाव दुकानांच्या व्यापाऱ्यांनातांदूळ आणि गहू थेट खरेदी करणारे एजंट म्हणून काम करण्याची परवानगी द्यावी. आमच्या मागण्या टीएमसी खासदार सौगता रॉय यांनीही संसदेत मांडल्या.

AIFPSDF च्या नऊ मागण्या आहेत ज्यात तांदूळ, गहू आणि रास्त भाव दुकानातून विकल्या जाणार्‍या सा खर तसेच खाद्यतेल आणि डाळींच्या  नुकसानीची भरपाई द्यावी. मोफत वितरणाचे’पश्चिम बंगाल रेशन मॉडेल’ देशभरात लागू केले जावे, अशीही त्यांची मागणी आहे. AIFPSDF ने निवेदनात म्हटले आहे की,"जम्मू आणि काश्मीरसह सर्व राज्यांना देय असलेल्यामार्जिनची त्वरित परतफेड करावी अशी आमची मागणी आहे.