ऐकून विश्वास बसणार नाही, पण ‘या’ कॅफेत मोफत मिळतं अन्न; भारतातच आहे हा अनोखा कॅफे

Free food in Seva cafe: जीएसटी लागू झाल्यानंतर रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. त्यामुळे आता लोकांना घरची डाळ आणि रोटी खायला जास्त आवडते. विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एसी रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करणे कठीण झाले आहे. परंतु जर आम्ही तुम्हाला सांगितले की, तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलात आणि तुम्हाला बिल भरावे लागणार नाही, तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. जगात असे एक रेस्टॉरंट आहे, जिथे जेवण केल्यानंतर तुम्हाला बिल भरावे लागणार नाही. होय, तुम्हाला कदाचित विनोद वाटेल, कारण भारतात मोफत जेवण फक्त कोणाच्या तरी घरी, लग्नात किंवा लंगरमध्ये मिळते. पण तुम्हाला हे जाणून आणखी आश्चर्य वाटेल की, हे मोफत अन्न मिळणारे रेस्टॉरंट इतर कोठे नसून भारतातीलच एका शहरात आहे…

भारतातील या शहरात मिळतं मोफत अन्न
गुजरातमधील अहमदाबाद शहरातील गुजराती सेवा कॅफे (Seva Cafe) लोकांना मोफत खाऊ घालते. येथे तुम्ही भरपूर अन्न खाऊ शकता आणि तेही बिल न भरता, कारण येथे तुमचे दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण एखाद्या अज्ञात व्यक्तीसाठी भेट आहे. सेवा कॅफे गेली 12 वर्षे याच पद्धतीने काम करत आहे. जग पैसा आणि व्यवसायाच्या मागे लागलेले असताना, मानव सदन, ग्रामश्री आणि स्वच्छ सेवा या एनजीओ मिळून सेवा कॅफे चालवत आहेत.

कॅफे गिफ्ट इकॉनॉमीवर चालतो
हा कॅफे गिफ्ट इकॉनॉमीच्या मॉडेलवर काम करतो. गिफ्ट इकॉनॉमी म्हणजे ग्राहक त्यांच्या इच्छेनुसार पैसे देतात, त्यानंतर त्यांच्या पैशाने दुसऱ्या ग्राहकाला जेवण दिले जाते. कॅफेचे संचालक सांगतात की, अनेक स्वयंसेवक ते एकत्र चालवतात आणि प्रत्येक ग्राहकाला प्रेमाने खायला देतात.

ग्राहक जास्त पैसे देतात
हे स्वयंसेवक स्वतःला “मूव्ह्ड बाय लव्ह व्हॉलिंटियर्स” म्हणवतात. त्यांच्या सेवेच्या बदल्यात या स्वयंसेवकांना कॅफेकडून विविध भेटवस्तू मिळतात. सेवा कॅफेमध्ये पहिल्यांदाच आलेल्या अनेकांना हे नवीन मॉडेल समजत नाही. आणि ते एक मूड तयार करतात. पैसे देत नाहीत किंवा कमी देतात पण या कॅफेचे वातावरण आणि स्वयंसेवकांचे समर्पण पाहून थोडे जास्त पैसे देऊन ते निघून जातात.

दररोज 50 लोकांना जेवण दिले जाते
कॅफेची एक स्वयंसेवक सांगते की, जेव्हा ती आपल्या मैत्रिणींसोबत या कॅफेमध्ये पहिल्यांदा आली होती, तेव्हा तिला वाटले होते की जेवणानंतर रिकामा लिफाफा टेबलावर ठेवू. पण कॅफेचा सर्व्हिस रेट पाहून तिने आणखी काही पैसेही पाकिटात ठेवले. सेवा कॅफे गुरुवार ते रविवार संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत चालू राहतो. किंवा मग 50 लोकांना मोफत अन्न खाऊ घालेपर्यंत खुले असते.