Pragati Ahir | हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर कडक कारवाई करा

Pragati Ahir | भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले. रेवन्नाने ब्लॅकमेल करुन महिलांवर अत्याचार केले व त्यांचे व्हिडिओही बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या नराधमासाठी मते मागितली तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याचा उल्लेख श्री. रेवन्ना असा केला. प्रज्वल रेवन्नाने केलेले गुन्हे अत्यंत गंभीर असून त्याच्या मुसक्या आवळून कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मीडिया विभागाच्या महाराष्ट्र समन्वयक प्रगती अहिर (Pragati Ahir) यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रगती अहिर म्हणाल्या की, प्रज्वल रेवन्ना याच्या सेक्स स्कँडलची माहिती भारतीय जनता पक्षाला होती, असे असतानाही भाजपाने जेडीएसबरोबर कर्नाटकात युती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रज्वल रेवन्नाचा प्रचारही केला. रेवन्नाला मत म्हणजे मोदीला मत असे मोदी म्हणाले. हजारो महिलांवर अत्याचार करणारा प्रज्वल्ल रेवन्ना मोदीशाह यांच्या नाकाखालून परदेशात पळला कसा. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वैयक्तीक कामासाठी किंवा उपचारासाठी परदेशात गेल्याची माहिती नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी असते पण रेवन्ना पदेशात पळून गेला याची माहिती कशी मिळाली नाही.

कर्नाटकातील हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले हा नारीशक्तीचा, मातृशक्तीचा अपमान नाही का. नारीशक्ती, मातृशक्ती या भाजपाच्या पोकळ घोषणा आहेत. मागील १० वर्षांच्या भाजपा राजवटीत देशभरात लाखो महिलांवर अत्याचार झाले, भाजपा खासदार ब्रिजभूषणसिंह याने महिला खेळाडूंवर अत्याचार केले पण त्याचावरही कारवाई केली नाही. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले त्यावर भाजपा व नरेंद्र मोदी काहीही बोलले नाहीत. भाजपा राजवटीत महिला सुरक्षित नाहीत, असेही प्रगती अहिर म्हणाल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, मुरलीधर अण्णांचा विश्वास

Narendra Modi : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ, नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?