मराठा समाज जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या अंगावर आला, तेव्हा अजित पवारांना डेंग्यू झाला – कदम

मराठा समाज जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या अंगावर आला, तेव्हा अजित पवारांना डेंग्यू झाला - कदम

Ramdas Kadam Vs Ajit Pawar – मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असताना अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना डेंग्यू झाल्याची बातमी समोर आली. अजित पवारांच्या या आजारपणाचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीही अजित पवारांवर टीकास्र सोडलं आहे.

मराठा समाज जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगावर आला, तेव्हा अजित पवारांना डेंग्यू झाला, अशी उपरोधिक टीका रामदास कदम यांनी केली. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातील आमदार सरकारविरोधात आंदोलन कसं काय करू शकतात, हेच मला समजत नाही, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

रामदास कदम म्हणाले, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार शरद पवारांचे (Sharad Pawar) आशीर्वाद घ्यायला गेले, हे आपण समजू शकतो. पण काल दिलीप वळसे पाटीलही( Dilip Walse Patil) पवारांकडे आशीर्वाद घ्यायला गेले. सुनील तटकरेही (Sunil Tatkare) आशीर्वाद घ्यायला गेले आणि तिथून ते अमित शाहांना भेटायला दिल्लीत गेले. मराठा समाज जेव्हा एकनाथ शिंदेंच्या अंगावर आला, तेव्हा नेमका अजितदादांना डेंग्यू झाला. अजित पवारांचे २० पैकी २० आमदार एकनाथ शिंदे आणि शासनाच्या विरोधात मंत्रालयात आंदोलन करू लागले. त्यांनी मंत्रालयाचं गेट बंद केलं, हेच मला कळत नाही.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…

Previous Post
पोलीस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले; सोलापूर हादरले

पोलीस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले; सोलापूर हादरले

Next Post
Gautami Patil: गौतमीच्या क्रेझमुळे आव्हाडांच्या पोटात दुखलं?

Gautami Patil: गौतमीच्या क्रेझमुळे आव्हाडांच्या पोटात दुखलं?

Related Posts
ashish shelar

गृहनिर्माण सोसायटीच्या निवडणूक खर्चात कपात; आशिष शेलार यांची मागणी मान्य

मुंबई – भाजपा- शिवसेना युतीचे सरकार येताच गृहनिर्माण सोसायट्यांना (housing societies) मोठा दिलासा देण्यात आला असून सोसायटीच्या निवडणूक…
Read More
धोनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर; जाणून घ्या ऑपरेशननंतर तो मैदानात कधी परतणार

धोनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर; जाणून घ्या ऑपरेशननंतर तो मैदानात कधी परतणार

MSD : चेन्नई सुपर किंग्ज इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमात चॅम्पियन बनला आहे. मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा…
Read More
मुंबईतील १ मे रोजीच्या वज्रमूठ सभेसाठी काँग्रेसची जय्यत तयारी :- नाना पटोले

मुंबईतील १ मे रोजीच्या वज्रमूठ सभेसाठी काँग्रेसची जय्यत तयारी :- नाना पटोले

मुंबई- महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वज्रमूठ सभा राज्यभर होत असून छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील सभेनंतर तिसरी…
Read More