Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

Latur Crime News : आज अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकाव्णारी एक घटना समोर आली आहे. विवाहितेचे शारीरिक शोषण करणाऱ्या मौलानाचे दुष्कृत्य समोर आले असून आता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी 22 वर्षीय विवाहितेने तक्रार केली होती. धक्कादायक बाब म्हणजे या पीडितेवर मौलानाकडून तिच्यावर वयाच्या अकराव्या वर्षापासून अत्याचार सुरू होते.

व्हिडिओ समोर आल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मौलानास चोप दिला. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिसात गुन्हा दाखल आहे. मौलाना इस्माईल करीम शेख उर्फ मौलाना कासमी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लातूर शहरातील गावभागातील एक 22 वर्षीय विवाहिता मागील दहा वर्षापासून शारीरिक शोषण करणाऱ्या मौलानाच्या त्रासाला कंटाळून गेली होती. या त्रासातून सुटका मिळावी यासाठी मौलानास पुराव्यासह पकडण्यासाठी त्याचा एक व्हिडिओ करण्यात आला होता. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता समाजातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

विवाहित पीडित ही बावीस वर्षाची आहे. लातूर शहरातील गाव भागात ही विवाहिता पती दीर आणि सासऱ्यासोबत राहते. तिचे हे दुसरे लग्न आहे. पहिले लग्न न टिकल्याने त्यांचा घटस्फोट झाला होता. या आरोपी मौलना कासमीमुळे तिचा दुसरा विवाहही संकटात आला होता. या मौलानाचे लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मदरसे आहेत. याच मदरशामध्ये वयाच्या अकराव्या वर्षापासून शिक्षण घेणाऱ्या पीडितेवर या मौलानाची वाईट नजर होती. त्यावेळेस पासून मुलांना सातत्याने पीडितेचे शारीरिक शोषण केलं आहे. पहिले लग्न ही मौलानाने लावून दिलं आणि काडीमोड ही करायला लावला होता. दुसरे लग्न ही लावण्यात ह्याच मौलानांचा पुढाकार होता.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

IND Vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत

Previous Post
Apple लवकरच OLED डिस्प्लेसह iPad Air आणि iPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह iPad Air आणि iPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Next Post
सार्‍या जगाचा राम लल्ला, भाजप हरला तर दर्शन घेऊ देणार नाही का?

सार्‍या जगाचा राम लल्ला, भाजप हरला तर दर्शन घेऊ देणार नाही का?

Related Posts
नामांतराच्या निर्णयाविरोधात छ. संभाजीनगरामध्ये राष्ट्रवादीत सामूहिक राजीनामे

नामांतराच्या निर्णयाविरोधात छ. संभाजीनगरामध्ये राष्ट्रवादीत सामूहिक राजीनामे

छत्रपती संभाजीनगर :- महाराष्ट्र शासनाने शिंदे फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt)loks औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati…
Read More
नाना पटोले

ठाकरे गटाची ताकत वाढली; अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा पाठिंबा

मुंबई  – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची…
Read More
भारत का विजेता होईल याची ५ कारणे? बुमराह नसतानाही रोहितची सेना चॅम्पियन्स ट्रॉफीवर वर्चस्व गाजवेल!

भारत का विजेता होईल याची ५ कारणे? बुमराह नसतानाही रोहितची सेना चॅम्पियन्स ट्रॉफीवर वर्चस्व गाजवेल!

चॅम्पियन्स ट्रॉफी ( Champions Trophy 2025) सुरू होण्यासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. या मोठ्या स्पर्धेसाठी भारतीय…
Read More