Manoj Jarange : जरांगेंची तोफ करमाळ्यात धडाडणार, तब्बल 125 एकरवर सभेची तयारी

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) हे 15 नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी सोलापूरच्या (Solapur) करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 या ठिकाणी जरांगेंची भव्य सभा होत आहे.

तब्बल 125 एकर शेतात या सभेचं नियोजन करण्यात येत आहे. तसेच, सकल मराठा समाजाच्या वतीने या सभेची तयारी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज सभास्थळाची पाहणी करण्यात आली.सोलापूर जिल्ह्यातील एक लाख मराठा बांधव या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

भेच्या ठिकाणी मराठा बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची, रुग्णवाहिका आणि डॉक्टर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. उजनी जलाशयाच्या नैसर्गिक सानिध्यात आयोजित करण्यात आलेली ही सभा संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. तर, उद्या होणाऱ्या या सभेची सकल मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांकडून आणि आयोजकांकडून आज पाहणी करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

IND Vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत