नरेंद्र मोदी साक्षात श्री कृष्णाचा अवतार, ते सामान्य माणूस नाहीत; कंगनाचे लक्षवेधी विधान

Kangana Ranaut Praised Narendra Modi: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. कंगनाने नुकतेच पंतप्रधान मोदींचे कौतुक करत त्यांना श्रीकृष्णाचा (Shri Krishna) अवतार म्हटले आहे, ज्यानंतर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

कंगना म्हणाली, “मी हे म्हणण्याचे कारण म्हणजे ते या देशासाठी आहे. जसा एक अवतार देशाच्या कल्याणासाठी असतो, तसेच नरेंद्र मोदी आपल्यासाठी एक अवतार (Incarnation Of Shri Krishna) आहेत. ते काही सामान्य माणूस नाहीत. या देशाच्या उद्धारासाठी त्यांचा जन्म झाला आहे.”

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने सांगितले की, तिचे आवडते व्यक्ती पीएम मोदी आहेत. पुढे मुलाखतीत, जेव्हा अभिनेत्रीला विचारले गेले की ती नरेंद्र मोदी, अटलबिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांच्यापैकी कोणत्या पंतप्रधानाची सर्वात जास्त प्रशंसा करते. यावर अभिनेत्रीने लगेच उत्तर दिले, “माझे आवडते पंतप्रधान माझे आवडते व्यक्ती आहेत, पंतप्रधान मोदी.”

तसेच “श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा सुदामाने त्यांच्याबद्दल सांगितले होते की तो देव आहे, पण दुर्योधन म्हणाला होता की तो देव का आहे. तो दिवसभर महिलांसोबत नाचतो, गप्पागोष्टी करतो आणि त्याला दुसरे काही काम नसते. म्हणून, जर तुमचा विश्वास चांगला नसेल तर तुम्ही सर्वशक्तिमान देवाचा अनादर देखील करू शकता.” असेही कंगना म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या-

जावई केएल राहुल नव्हे तर सुनील शेट्टीला आवडतो ‘हा’ खेळाडू, पाहा कोण आहे तो?

अभिनेता रजनीकांत यांचा डाय हार्ड फॅन, उभारलं भव्यदिव्य मंदिर; होतेय सर्वत्र चर्चा

भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता, शोधासाठी पोलिसांची 6 पथके रवाना