पोलीस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले; सोलापूर हादरले

Police Suicide In Solapur: सोलापूर शहरात केशवनगर पोलीस वसाहतीत एका पोलीस शिपायाने स्वतःवर पिस्तूलने गोळी झाडून घेत आत्महत्या केली. आज सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. राहुल शिरसट (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या पोलीस, शिपायाचे नाव आहे. या घटनेचे निश्चित कारण लगेचच समजू शकले नाही.

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेले राहुल शिरसट हे पोलीस आयुक्त बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिका-यांसह सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल दाखल झाले. शिरसट यांनी सरकारी पिस्तूलने स्वतःच्या हनुवटीवर गोळी झाडली.

दीपावलीत फटाके फोडले जात असल्यामुळे शिरसट यांनी स्वतःवर गोळी झाडल्याचा आवाज पोलीस वसाहतीत लगेचच लक्षात आला नाही. दरम्यान, शिरसट यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…