पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…

Abdul Razzaq on Aishwarya Rai : पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अब्दुल रज्जाक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची तुलना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत करत आहे.

अब्दुल रज्जाकच्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हेतूबद्दल बोलताना अब्दुल रज्जाक म्हणाला की, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ऐश्वर्या रायशी लग्न कराल आणि त्यानंतर एक सद्गुणी मूल जन्माला येईल असे वाटत असेल तर असे कधीही होऊ शकत नाही. तुम्हाला तुमचे हेतू सुधारावे लागतील.

अब्दुल रज्जाक जेव्हा हे बोलत होते तेव्हा त्याच्यासोबत शाहिद आफ्रिदीसह (Shahid Afridi) अनेक क्रिकेटर्स उपस्थित होते.दरम्यान, आता अब्दुल रज्जाकच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. सोशल मीडिया यूजर्स सतत अब्दुल रज्जाकवर टीका करत आहेत. शोएब अख्तर म्हणाला की मी अब्दुल रज्जाकच्या अनुचित विनोदाचा किंवा तुलनात्मक विधानाचा निषेध करतो. कोणत्याही महिलेचा अपमान होता कामा नये. रावळपिंडी एक्स्प्रेसने असेही म्हटले की, शेजारी बसलेल्या लोकांनी हसून टाळ्या वाजवण्याऐवजी आवाज उठवायला हवा होता.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

IND Vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत