‘संजय राऊत मागे म्हणाले होते की आमची आघाडी 25 वर्षे टिकणार आहे, पण…’

Ajit Pawar : भाजपला पराभूत करून पुन्हा सत्तेत येण्याच्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) स्वप्नांना काल खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुरुंग लावला. कारण खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत शक्य आहे तोपर्यंत राहू त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ असं ठाकरे गटाच्या राज्यव्यापी शिबीरात जाहीर केले आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे का ? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

संजय राऊत म्हणाले की, आता सगळे भावी मुख्यमंत्री समोर येताय. या भावी मुख्यमंत्र्याचा पीक आलाय. माझ्यासमोरही  एक भावी मुख्यमंत्री आहेत. आपण राहू महाविकास आघाडीमध्ये जोपर्यत आहोत तोपर्यंत. ज्यावेळी निर्णय घ्यायचा तेव्हा घेऊ. विद्यामान मुख्यमंत्री समोर आहेत, कोर्ट काय म्हणाल होत आम्ही पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री केलं असते, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी यावेळी स्वबळाचा नारा दिला. महाराष्ट्रात भगवा फडकवू असे त्यांनी म्हटले. मुंबईत आमचीच सत्ता येणार..त्याशिवाय महाराष्ट्रातही स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईल, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. गद्दारांना आपल्याला धडा शिकवायचाय, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, याबाबत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, त्यांचा पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार आहे. तीन पक्ष एकत्र आल्याशिवय आम्ही शिंदे आणि भाजपचा मुकाबला करु शकत नाही. हेच संजय राऊत मागे म्हणाले होते की आमची आघाडी 25 वर्षे टिकणार आहे. त्यावेळी त्यांना आघाडी 25 वर्ष टिकेल असे वाटतं होते पण आता त्यांना एकट्याचे सरकार यावं अस वाटत असेल तर चुकीचे काय आहे ? काहीतरी ध्येय डोळयासमोर ठेवून वाटचाल करीत असतो आणि ती इच्छा त्यांनी बोलून दाखवली, त्यांना आमच्या शुभेच्छा, असे अजित पवार म्हणाले.