राज ठाकरेना आलेल्या धमकीबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले….

मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरु असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र त्यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा देत भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह (BJP MP Brijbhushan Sharan Singh) यांनी दिला आहे.

या सर्व घडामोडी घडत असताना आता मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना धमकीचं एक पत्र आलं आहे ते हिंदीत आहे मात्र, त्यात उर्दू शब्दांचाही उल्लेख असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत बोलताना नांदगावकर यांनी एक इशारा सुद्धा दिला आहे. मी इतकेच सांगू इच्चितो की, बाळा नांदगावकर ठीक आहे पण राजसाहेब ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर मात्र, महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही. याची दखल राज्य सरकारने घ्यावी असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

आता या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, मनसेचे बाळा नांदगावकर हे गृहमंत्र्यांना भेटले आहेत. प्रत्येकाला या राज्यात सुरक्षित वाटावं हे सरकारचं काम आहे. जी धमकी आली आहे किंवा जे काही माहिती त्यांनी दिली आहे त्याबाबत गृहमंत्री निर्णय घेतील. कुणाला संरक्षण दिले पाहिजे याबाबत एक समिती असते ते निर्णय घेतात हेही सांगितले.