Nashik News | येवला मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या ३४ शाळांना मिळणार झळाळी

Nashik News | राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विशेष प्रयत्नांतून जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांची इमारती वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहाच्या विशेष दुरुस्तीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २ कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून मतदारसंघातील ३४ जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन वर्ग खोल्या, विशेष दुरुस्ती व पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहे. त्यामुळे या शाळांना झळाळी प्राप्त होऊन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

यामध्ये येवला (Nashik News) तालुक्यातील देवरगांव, गोपाळवाडी, फरताळवाडी, साताळी, धनकवाडी, भुलेगांव, ममदापूर, रेंडाळे, पन्हाळसाठे, कोळगांव, सायगांव जिल्हा परिषद शाळेतील नवीन वर्ग खोल्यांसाठी प्रत्येकी ९ लाख ९० हजार, खामगांव जिल्हा परिषद शाळेसाठी १९ लाख ८० हजार, आहेरवाडी, खामगांव जिल्हा परिषद शाळेसाठी प्रत्येकी ८ लाख ५० हजार, वडगांव बल्हे, बोकटे, लमानतांडा, अनकाई, तळवाडे, कौटखेडा,  डोगरगांव,मुखेड, खरवंडी, भारम, कुसमाडी, नगरसुल शाळेसाठी प्रत्येकी  ४ लाख २५ हजार निधी मंजूर करण्यात आला आहे.

निफाड तालुक्यातील कानळद, खानगांव नजिक, वाकद, विंचूर  जिल्हा परिषद शाळेतील नवीन वर्ग खोल्यांसाठी प्रत्येकी ९ लाख ९० हजार,  प्रतापसागर, टाकळी विंचूर जिल्हा परिषद शाळेसाठी प्रत्येकी ४ लाख ४५ हजार, धारणगांव वीर, वाकद,  जिल्हा परिषद शाळेसाठी प्रत्येकी ८ लाख ५० हजार निधी मंजूर करण्यात आला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

या शाळांच्या नवीन वर्ग खोल्या, विशेष दुरुस्ती व पायाभूत सुविधांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा निर्माण होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन – Pankaja Munde

तुम्ही ज्या जागा जिंकू शकणार नाहीत, त्याच मविआ तुम्हाला देत आहे- Nitesh Rane

खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका; Chandrashekhar Bawankule यांचा पलटवार