इंग्लंडला धूळ चारत भारत बनला नंबर १, विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम केला नावावर

ICC Cricket World Cup 2023: विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं इंग्लंडचा (IND vs ENG) 100 धावांनी धुव्वा उडवला. लखनौमध्ये झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी 230 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यावर रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधारपदाला साजेशी खेळी करत 87 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 49 धावांची खेळी केली. 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडचा अख्खा संघ अक्षरशः गारद झाला.

इंग्लंडच्या संघाला 35 व्या षटकापर्यंत केवळ 129 धावाच करता आल्या. मोहम्मद शमी (Mohammad Shami), जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव या भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांची पळताभुई थोडी केली. रोहित शर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या विश्वकरंडक स्पर्धेतला भारताचा हा सलग सहावा विजय आहे. या विजयासह टीम इंडिया केवळ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आली नाही तर विश्वचषकाच्या इतिहासात एक नवा विक्रमही केला आहे. या सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा दुसरा संघ बनला आहे.

आतापर्यंत झालेल्या विश्वचषकातील सर्व सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा संघ ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकूण 73 विश्वचषक सामने जिंकले आहेत . त्याचवेळी, आता या यादीत दुसरे नाव भारताचे आहे, ज्याने 59 विश्वचषक सामन्यांमध्ये विजयाची चव चाखली आहे. या यादीत भारतानंतर न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने आतापर्यंत एकूण 58 विश्वचषक सामने जिंकले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
‘आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा आणि जरांगे पाटलांची प्रकृती व्यवस्थित राहावी हीच अपेक्षा’

दुर्दैवाने जरांगे पाटलांच्या जीवाला काही धोका झाला तर….; रोहित पवारांचा सरकारला इशारा

कुणाच्याही ताटातलं न काढता मराठ्यांना आरक्षण द्या; शरद पवारांची आक्रमक मागणी