अमोल मिटकरींच्या अडचणी वाढल्या; बेताल वक्तव्याप्रकरणी कारवाई करण्याचे राज्यपालांचे निर्देश

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी दिले आहेत. इस्लामपूर येथे एप्रिल महिन्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) सभेदरम्यान बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदू धर्मातील विवाह पद्धती व पुरोहितां बाबत अपमानास्पद वक्तव्य (Insulting statements about marriage practices and priests in Hinduism) केले होते. यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती.

ब्राह्मण समाजाच्या (Brahmin society) वतीने परशुराम सेवा संघाने (Parashuram Seva Sangh) विविध ठिकाणी पोलीस तक्रार केल्या होत्या परंतु त्यावर कोणतीही कारवाई पोलिसांकडून झाली नाही त्यामुळे परशुराम सेवा संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अभिषेक समुद्र (Abhishek Samudra) यांनी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना निवेदन देऊन या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती त्यावर राज्यपालांनी ठाणे पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

यासंदर्भात बोलताना परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे (Vishwajeet Deshpande) असे म्हणाले की आम्ही राज्यात 16 ठिकाणी ब्राह्मण समाजाने पोलीस तक्रारी करूनही अमोल मिटकरीवर कुठेही गुन्हा दाखल झाला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गृहमंत्री असल्यामुळे पोलीस राष्ट्रवादीच्या लोकांवर कारवाई करत नाहीत त्यामुळेच आम्ही राज्यपालांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला महामहीम राज्यपालांनी आज हे निर्देश दिल्यामुळे ठाण्याचे पोलिस आयुक्त कारवाई करतील अशी आम्हाला आशा आहे राज्यपालांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस आयुक्तांना निर्देश दिले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.