उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे आभार मानले पाहिजेत – दिपाली सय्यद

मुंबई – विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC election) भाजपने आपल्या चार उमेदरवांची नावे निश्चित (BJP decide four names for MLC Vidhan Parishad Election) केली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी आपले चार उमेदवार निश्चित केले आहेत. यामध्ये प्रवीण दरेकर (Pravin Darekar), राम शिंदे (Ram Shinde), प्रसाद लाड (Prasad Lad) आणि श्रीकांत भारतीय यांच्यासह उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ (Pankaja Munde and Chitra Wagh) यांना मात्र संधी मिळालेली नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत. भाजप नेतृत्वानं अचानक उमा खापरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना डावललं. खापरे यांच्यासाठीही हा धक्का होता.

खापरे या भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. त्यापूर्वी त्या महिला मोर्च्याच्या प्रदेश सचिव होत्या. तर, त्याअगोदर त्या दोन टर्म पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) नगरसेवक राहिलेल्या आहेत. २००१-०२ मध्ये पालिकेत त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक (Late. Supporters of Gopinath Munde) आणि जुन्या एकनिष्ठ भाजप पदाधिकारी पिंपरी-चिंचवडकर उमा खापरे यांना संधी देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवडला तिसरा आमदार मिळणार आहे. पंतप्रधान मोदींवर सडकून टीका करणाऱ्या शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांना घरात घुसून मारण्याचा इशारा खापरेंनी दिल्याने नुकत्याच त्या चर्चेचा विषय झाल्या होत्या.

दरम्यान,आता  दिपाली सय्यद (Deepali Syed)यांनी उमा खापरे यांच्याबाबत एक ट्वीट करत पुन्हा एकदा त्यांना डिवचले आहे. उमा खापरे यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे (Chief Minister Uddhav Saheb Thackeray) यांचे आभार मानले पाहिजेत, शिवसेनेमुळे भाजपात कोणी आमदार बनत असेल तर त्याबद्दल शिवसेनेचे कौतुकच आहे. असं सय्यद यांनी म्हटले आहे.