Sunil Tatkare | मच्छीमारीचा व्यवसाय करणाऱ्या बांधवांबद्दल कोणतीही चुकीची पध्दत खपवून घेतली जाणार नाही

Sunil Tatkare | परंपरागत… वर्षोनुवर्षे… शेकडो वर्षे मच्छीमार बांधव मच्छीमारीचा व्यवसाय करत आला त्यांच्याबद्दल कोणतीही चुकीची पध्दत खपवून घेतली जाणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी राजपुरी येथील जाहीर सभेत दिला.

माझ्या मच्छीमार बांधवांचा व्यवसाय सुरक्षित राहण्यासाठी जे काही करायचे असेल ते सर्व काम महायुती म्हणून सामुदायिक करणार आहोत. ती आमची बांधिलकी असणार आहे. पर्यटनावर आधारित रोजगार वाढेल रोजगाराची निर्मिती करायचीच आहे. अद्यावत जेटी आपण एवढ्याचसाठी करत आहोत की याठिकाणी मुरुडचा ऐतिहासिक जंजिरा किल्ला बघण्यासाठी शिवप्रेमी, पर्यटक येतील. अशावेळी पायाभूत सुविधा करण्यासाठी पावले उचलत आहोत. मच्छीमार बांधवांवर अन्याय होत असेल नुकसान भरपाई देण्याबाबत काही कमतरता रहात असेल तर ती भरुन काढण्यासाठी पुढच्या कालावधीत शंभर टक्के काम करणार आहोत असा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला.

पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यावर हा परिसर बदलला जाणार आहे. या बदलणार्‍या प्रवाहाबरोबर स्थानिक माणूस ठळकपणे दिसला पाहिजे. अनेक प्रकल्प येतात. उद्याच्या भविष्यात जे जे प्रकल्प येतील त्यामध्ये शंभर टक्के इथला भूमीपुत्र राहिल याची खबरदारी घेणार आहोत असा विश्वास सुनिल तटकरे यांनी राजपुरी ग्रामस्थांना दिला.

एक हजार कोटीची जेटीची कामे महायुतीच्या माध्यमातून सुरू आहेत. यामध्ये अद्यावत पध्दतीची जेटी मिळणार आहे. मच्छीमार व्यवसाय सुरक्षित राहिल. कोल्ड स्टोरेज राज्यसरकारच्या माध्यमातून उभे केले जाईल. एक हजार कोटी रुपयांचे परकीय चलन या काबाडकष्ट करणार्‍या माझ्या मच्छीमार बांधवांमुळे मिळते. मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक सुविधा देण्याचे काम सागरमाला योजनेतंर्गत नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून केले आणि पंतप्रधान मत्स्य योजना यापूर्वी कधी आणली गेली नाही अशी योजना देशाच्या पंतप्रधानांनी आणली. या योजनेमध्ये अनेक व्यक्तीगत लाभार्थ्यांना, अनेक जेटींना थेटपणे अनुदान देण्याच्या योजना आहेत. हा सुनिल तटकरे तुमचा सेवक म्हणून या योजना राजपुरीच्या गणात आणण्यासाठी वचनबद्ध आहे असा शब्दही सुनिल तटकरे यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे येथे सोमवारी जाहीर सभा पार पडली असून पुणे जिल्हयातील सर्वच्या सर्व जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन