Ajit Pawar हे लांडग्यांच्या कळपातून परत शरद पवारांच्या सोबत येणार?

Deepak Mankar vs Prashant Jagtap : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलेल्या एका ट्विटची जोरदार चर्चा सुरु होती. प्रशांत जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना परत शरद पवार यांच्यासोबत येण्याची साद घातली होती.

लांडग्यांच्या युतीत जाऊन वाघाला समाधान लाभत नाही, तो अस्वस्थच असतो. पोटाची खळगी भरते पण रुबाब आणि आदर जातो. लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडून पुन्हा जंगलाचा राजा होण्याची संधी वाघाकडे कायम असते”, असं ट्विट प्रशांत जगताप यांनी केलं होते. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार हे लांडग्यांच्या कळपात गेले नाहीत तर लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडून सिंहांच्या सोबत गेल्याची खोचक टीका मानकर यांनी केली आहे. सिहाला स्वतःचे अस्तित्व असते त्याला कोणत्याही कळपाची आवश्यकता नसते असं मानकर यांनी ठणकावून सांगितले आहे. आझाद मराठीला दिलेल्या स्पेशल मुलाखतीमध्ये त्यांनी जगताप यांचा चांगलाच समाचार घेतला असून जगताप यांच्या बोलण्याला काहीही महत्व नसल्याचे देखील म्हटले आहे.

पहा दीपक मानकर यांनी प्रशांत जगताप यांच्यावर कशी टीका केली आहे :-

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर