Ankush Chaudhary | अंकुश चौधरी बनला प्रस्तुतकर्ता ‘बैदा’नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल

अंकुश चौधरी (Ankush Chaudhary)… मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार. स्टाईल आयकॉन म्हणूनही अंकुशकडे पाहिले जाते. यापूर्वी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेच. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता अंकुश एका नवीन भूमिकेतून आपल्या समोर येत आहे. संदीप पोपट दंडवते लिखित, दिग्दर्शित ‘बैदा’ नाटकाचा प्रस्तुतकर्ता असून येत्या १६ मार्चपासून हे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. नाट्य मल्हार निर्मित या दोन अंकी नाटकात उन्नती कांबळे, अक्षय काळकुटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्वतःसाठी कुटुंबासाठीची लढा… अशी टॅगलाईन असलेले हे नाटक कौटुंबिक आहे.

आपल्या या नवीन भूमिकेबद्दल अंकुश चौधरी (Ankush Chaudhary) म्हणतात, ” बऱ्याच दिवसापासून एखादे चांगले नाटक प्रस्तुत करावे अशी इच्छा होती. याचदरम्यान संदीप दंडवते लिखित, दिग्दर्शित ‘बैदा’ हे नाटक पाहाण्यात आले. उत्तम सादरीकरण, अतिशय चांगला विषय आहे. त्यामुळे हे जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे, असे मला मनापासून वाटले. म्हणून मी या नाटकाचा भाग झालो. या नाटकाच्या माध्यमातून मी प्रथमच प्रस्तुतकर्ता म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | निलेशला मीच पक्षात आणलं, त्याला प्रचंड निधीही दिला, पण…. अजित पवारांनी मनातली खदखद बोलून दाखवली

Ajit Pawar | पक्षातून वेगळे झालात, मग शरद पवारांचे फोटो कशाला वापरता? सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना फटकारले

Nitin Gadkari | नागपूर शहरात २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे