Lalu Prasad Yadav | ‘मुस्लिमांना आरक्षण मिळाले पाहिजे’, लालू प्रसाद यादव यांचे लक्षवेधी वक्तव्य

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मुस्लिमांना आरक्षण मिळालेच पाहिजे, असे लालू यादव यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. बिहारमध्ये लालू-राबडी राजवटीत जंगलराज असल्याच्या आरोपांवर लालू यादव यांनीही पलटवार केला आहे. ते म्हणाले- मतदार आमच्या पाठीशी आहेत, ते घाबरले आहेत, म्हणूनच ते जंगलराजचे नाव घेऊन जनतेला भडकवत आहेत. त्यांना राज्यघटना नष्ट करायची आहे, लोकशाही नष्ट करायची आहे, असे लालूप्रसाद म्हणाले. मुस्लिमांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर लालू यादव म्हणाले की, ‘मुस्लिमांना आरक्षण मिळाले पाहिजे,’

बिहारमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांचे आरक्षण लुटून ते मुस्लिमांना देण्याचा आरजेडी आणि काँग्रेसचा हेतू असल्याचा आरोप केला होता.

यावर लालू यादव (Lalu Prasad Yadav) यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत मुस्लिमांना आरक्षण मिळालेच पाहिजे असे सांगितले. तर आरजेडी नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले- माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्या कार्यकाळात मुस्लिमांसह मागासवर्गीयांसाठी आरक्षण सुरू करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्पूरी ठाकूर यांचा अपमान करण्यावर बेतले आहेत. मला आश्चर्य वाटते की मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू यावर गप्प का आहे?, असा सवाल त्यांनी केला होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | गड किल्ल्यांचे संवर्धन करणार, मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

Eknath Shinde | काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य, शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Raj Thackeray In Pune | मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, ‘या’ दिवशी घेणार जाहीर सभा