सलमान खान पुन्हा पडला प्रेमात? २४ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट

बॉलीवूडचा ‘दबंग खान’ अर्थातच सलमान खान हा हिंदी इंडस्ट्रीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. तो ५७ वर्षांचा असून अजूनही त्याने लग्न केलेले नाही. मात्र नेहमी सलमानच्या लग्नाच्या व अफेअरच्या अफवा उडत असतात. अशात आता सलमान पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या चर्चा आहेत. तसेच सलमानने त्या अभिनेत्रीला आपल्या २ चित्रपटांसाठी साईन केले असल्याचेही समजत आहे.

सलमान खान दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे हिला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. एवढेच नाही तर पूजा सलमानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातही काम करत आहे. पूजा हेगडे सलमान खानपेक्षा २४ वर्षांनी लहान आहे.

उमेर संधूच्या एका ट्विटने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सलमान आणि पूजा रिलेशनशिपमध्ये असल्याचे उमैरचे म्हणणे आहे. उमैरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे – ‘ब्रेकिंग न्यूज… शहरात एक नवीन जोडपे समोर आले आहे. मेगा स्टार सलमान खान पूजा हेगडेच्या प्रेमात पडला आहे. सलमानच्या प्रोडक्शन हाऊसनेही पूजाला त्याच्या दोन चित्रपटांसाठी साइन केले आहे. हे दोघे सध्या एकत्र वेळ घालवत असून सलमानच्या जवळच्या मित्रानेही याला दुजोरा दिला आहे.