दुर्दैवी! दिल्लीतील बेबी केअर सेंटरला लागलेल्या भीषण आगीत सात बालकांचा मृत्यू

Delhi Baby Care Center Fire: दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर सेंटरला लागलेल्या भीषण आगीत सात बालकांचा मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘बालकांच्या केअर सेंटरमधील आगीची ही घटना हृदयद्रावक आहे. या अपघातात ज्यांनी आपली निष्पाप मुले गमावली त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण उभे आहोत.’

सरकारी आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी जखमींवर उपचार करण्यात व्यस्त असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या घटनेमागच्या कारणांचा शोध घेतला जात असून या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

कोणालाही सोडले जाणार नाही – सौरभ भारद्वाज
दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. मी आरोग्य सचिवांना या घटनेची सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे. या प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही. निष्काळजीपणा किंवा कोणत्याही चुकीच्या कामात सहभागी असलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा सुनिश्चित केली जाईल.

दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर सेंटरमध्ये शनिवारी (25 मे) रात्री उशिरा लागलेल्या आगीत सात नवजात मुलांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडितांची अवस्था वाईट आहे, रडत आहेत. दिल्ली अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, त्यांना शनिवारी रात्री उशिरा रात्री 11.32 च्या सुमारास ही माहिती मिळाली.

महत्वाच्या बातम्या-

Jitendra Awad | जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या सीमेवर येऊन नाक घासून माफी मागावी, भाजपची मागणी

Ashish Shelar | उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पहायला गेलेत का?, आशिष शेलार यांचा सवाल

KKR VS SRH | “आम्ही सर्वोत्तम संघांपैकी एक…”, फायनलपूर्वी हैदराबादचा कर्णधार कमिन्सचे केकेआरला आवाहन