संगीतकार उस्ताद रशीद खान यांचे निधन, वयाच्या ५५ ​​व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rashid Khan Demise: ज्येष्ठ संगीत सम्राट उस्ताद रशीद खान यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या ५५ ​​व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उस्ताद रशीद खान यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता, त्यामुळे त्यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ते व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर होते. डॉक्टरांचे सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही.

उस्ताद रशीद खान यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही खूप प्रयत्न केले, पण अपयश आले. दुपारी ३.४५ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.’

गेल्या महिन्यात मेंदूचा झटका आल्यानंतर उस्ताद रशीद खान यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांनी सुरुवातीला टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत होती.

महत्वाच्या बातम्या-

महामानवांच्या विचारावर आमच्या पक्षाची वाटचाल सुरू असून आमचे व्हिजन क्लीअर आहे – अजित पवार

‘धर्माच्या नावावर द्वेष वाढविला जात आहे, संघाच्या शाखेपासून सोशल मीडियापर्यंत जाणीवपूर्वक या गोष्टी होत आहेत’

Lahu Balwadkar | लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व सोहळा

“येत्या निवडणुकीत तिप्पट नगरसेवक असतील अशी ताकद समीरभाऊ तुमच्या नेतृत्वाखाली पक्षात उभी राहिली आहे”