मी शिवसेनेचा वाघ, दोन बोक्यांची शिकार करणार – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष चांगलाच वाढला असून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. यातच आता औरंगाबादमधील शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी भाजप नेत्यांना दिलेला एक इशारा चांगलाच चर्चेचा मुद्दा बनला आहे.

चंद्रकात खैरे यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते तथा केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (bhagwat karad) आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मी शिवसेनेचा वाघ असून, मी शिकार करू शकतो. अनेकांची शिकार केली आहे. मला दोन बोके दिसतायत त्यांची मी शिकार करणार असा इशारा त्यांनी दिला आहे.

राज्य सभेच्या उमेदवारीबाबत बोलताना ते म्हणाले, मी जरी आज खासदार नसलो तरीही मी खासदारपेक्षा अधिक काम करतो. माझ्यासमोर हे कुणीही काम करत नाही. अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. लोकं मला खासदार म्हणतात त्यामुळे मी सुद्धा खुश होतो की, लोकं मला खासदार समजतात.तर पुढच्या लोकसभेच्या उमेदवारीच काही वचन मिळाले का ? असं विचारताच हे इथं सांगायचं नसतं असे खैरे म्हणाले.