सिनेमातून इतके पैसे कमवले, त्यातले काश्मिरी पंडितांना किती दिले? आशा पारेख यांचा अग्निहोत्रींना प्रश्न

Asha Parekh on kashmir files: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर आशा पारेख यांचे नाव त्यात नक्कीच सामील होईल. 60 आणि 70 च्या दशकात आपल्या दमदार चित्रपटांद्वारे चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या आशा पारेख यांनी अलीकडेच ‘द वॅक्सीन वॉर’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

द काश्मीर फाइल्स 2022 मध्ये रिलीज झाली, ज्यामध्ये काश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandit) मिळालेल्या क्रूर वागणूकीची आणि स्थलांतराची कहाणी दाखवण्यात आली होती. ‘द कश्मीर फाईल्स’वरून बराच वाद झाला होता, ज्याबाबत आता अभिनेत्री आशा पारेख बोलल्या आहेत. त्यांना एका मुलाखतीत ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’ यांसारख्या चित्रपटांच्या वादाबद्दल विचारले असता, आशा पारेख म्हणाल्या की, मी हे चित्रपट पाहिलेले नाहीत, त्यामुळे मी या वादावर बोलू शकत नाही. जेव्हा आशा पारेख यांना असे चित्रपट पहावेत आणि बनवावेत का? असे विचारले असता त्या म्हणाल्या की, लोकांना असे चित्रपट आवडत असतील तर ते बघावेत.

आशा पारेख यांनी मुलाखतीत पुढे सांगितले की, ‘निर्मात्याने चित्रपटातून 400 कोटी रुपये कमावले. मग त्यांनी जम्मूत राहणार्‍या, पाणी आणि वीज नसलेल्या हिंदू काश्मिरींना किती पैसे दिले? त्यांनी काश्मिरी पंडितांना किती पैसे दिले? त्यांनी भरपूर पैसे कमवले आहेत, त्यात त्यांचा आणि वितरकाचा वाटा असेल. अर्थात, 400 कोटी नाही तर 200 कोटींचा व्यवसाय केला असेल, त्यापैकी किमान 50 कोटी काश्मिरी हिंदूंना देता आले असते.” अशाप्रकारे आशा पारेख यांनी विवेक अग्निहोत्रीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. आशा पारेख यांचे हे विधान चर्चेचा विषय बनले असून चित्रपटाबाबत पुन्हा वाद सुरू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Navratri : राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

मुंबई भाजपकडून ‘वाघ नखांच्या निमित्ताने’ कार्यक्रमाचे आयोजन