राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी विद्या चव्हाण यांची वर्णी;  वैशाली नागवडे यांच्यावरही मोठी जबाबदारी 

मुंबई   – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड (Former MLA Vidya Chavan elected as Women Women President of NCP) केल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केली. सध्या राज्यातील जिल्हा कमिट्या तशाच राहणार आहेत मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागीय अध्यक्ष पद पहिल्यांदाच देण्याचा निर्णय झाल्याचे फौजिया खान यांनी सांगितले.

यावेळी नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली) (Nagpur Division President Shaheen Hakim (Gadchiroli)) , अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ)(Amravati Division President Varsha Nikam (Yavatmal)) , मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना)(Marathwada Division President Shazia Shaikh (Jalna)) , वैशाली मोटे (Vaishali Mote) (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे(West Maharashtra Division President Kavita Mhetre)  (सातारा), वैशाली नागवडे (Vaishali Nagwade) (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे(Archana Ghare)  (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (Rita Awhad) (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी आदींची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली.

यावेळी फौजिया खान यांनी विद्या चव्हाण यांना नियुक्तीपत्र दिले.विद्या चव्हाण यांनी ही नियुक्ती स्विकारत असल्याचे सांगतानाच महागाईसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाला आहे. महिला वर्ग त्रासाला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे स्पष्ट केले. अनेक महिला पक्षात चांगले काम करत आहेत. मला पक्षाने संधी दिली आहे आणि जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र ठरेन असे सांगतानाच माध्यमाकडून सहकार्य मिळावे अशी अपेक्षाही विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली.