‘मुस्लीम लोकही औरंगजेबाच्या कबरीवर जात नाहीत,त्या कबरीकडे जायचा त्यांचा उद्देश मला कळला नाही’

औरंगाबाद   – काल एमआयएमचे नेते  अकबरुद्दीन औवेसी (MIM leader Akbaruddin Owaisi) औरंगाबादच्या दौऱ्यावर  होते . या दौऱ्यादरम्यान त्यांनी  शहरातील धार्मिळ स्थळ आणि दर्ग्यांना (Dargah) भेटी दिल्या. विशेष म्हणजे त्यांनी  स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या मुगलसम्राट औरंगजेबच्या (Aurangzeb)  कबरीवर फुले वाहिली आणि ते नतमस्तक झाले. (Akbaruddin Owaisi at the tomb of Aurangzeb)

सुरुवातीला त्यांनी एका मस्जिदीत नमाज देखील अदा केली. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ), एमआयएम नेते वारीस पठाण आणि स्थानिक नेत्यांसह अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर गेले. कबरीवर फुलं वाहून ( Owesani laid flowers at Aurangzeb’s tomb ) पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्थ झाले.

दरम्यान, स्वराज्याच्या शत्रूचे उदात्तीकरण केल्याने ओवेसी आणि त्यांच्या पक्षावर आता टीका होत आहे.  यावरून शिवसेना नेते  चंद्रकांत खैरे (Shiv Sena leader Chandrakant Khaire) चांगलेच आक्रमक झाले आहेत.ओवेसी यांच्या दौऱ्यावर टीका करताना खैरे म्हणाले, हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधवांनी समजून घ्यायला हवे. कोणी येत आणि इथले वातावरण खराब करतात. आपण चांगल्या कामांचे स्वागत करु मात्र प्रसिद्धीसाठी तो माणून असं काही करत असतो. एमआयएमचा विचार औरंगजेबासारखा आहे. मुस्लीम लोकही औरंगजेबाच्या कबरीवर जात नाहीत. आमच्याकडे राम-संभाजी-दत्ता-शिवाजी अशी मुलांची नावे ठेवली जातात. एकाही घरात औरंगजेबाचे नाव ठेवले जात नाही. जलील यांनी त्यांच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवले आहे का ? असा सवाल करत खैरे यांनी जलील यांना निशाण्यावर घेतले.

तसेच याला शिवसेना उत्तर देणार आहे. आम्ही जनतेला दाखवून देणार यांचे राजकारण. कबरीवर जायची गरजच काय ? इथले वातावरण खराब करण्यासाठी हे मुद्दाम केले गेले. ते मुद्दाम हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जातीय तणाव निर्माण करण्यासाठी कबरीकडे गेले. आता आम्ही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच इकडे येउन कोणी तेड निर्माण करत असेल तर आम्ही ते कधीही सहन करणार नाही. मुस्लिम लोकही त्या कबरीकडे जात नाहीत. त्या कबरीकडे जायचा त्यांचा उद्देश मला कळला नाही, असेही खैरे म्हणाले.