शाहरुख खानच्या सोशल मीडिया एजन्सीने माझ्यावर हल्ला केलाय; विवेक अग्निहोत्रींचा गंभीर आरोप

Vivek Agnihotri: विवेक अग्निहोत्री हे सध्या त्यांच्या द व्हॅक्सिन वॉर (The Vaccine War) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. जोरदार प्रोमोशननंतरही हा सिनेमा अपेक्षित तितकी कमाई करू शकलेला नाही. आता नुकताच विवेक अग्निहोत्री यांनी शाहरुख खान याच्यावर गंभीर आरोप केले. विवेक अग्निहोत्री यांनी केलेले हो आरोप ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले.

विवेक अग्निहोत्री म्हणाले की, शाहरुख खान याच्या सोशल मीडिया एजन्सीने माझ्यावर हल्ला केलाय. एजन्सीने ट्रोल आणि बॉट्स तयार केले आहेत. या सर्वांनी माझ्यावर हल्ला केला आहे, विवेक अग्निहोत्री गंभीर आरोप करताना दिसत आहेत.

पुढे विवेक अग्निहोत्री हे म्हणाले की, मी नेहमीच शाहरुख खान (Shahrukh Khan) याचे कौतुक केले. परंतू मी त्याचे चित्रपट पाहिले आणि मला एक गोष्ट जाणवली की, त्याचे हे चित्रपट फार जास्त वरवरचे आहेत. यापेक्षा तो अधिक चांगले नक्कीच करू शकला असल्याचे म्हणताना देखील विवेक अग्निहोत्री हे दिसले आहेत. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट अजूनही बाॅक्स ऑफिसवर जलवा दाखवताना दिसतोय.

https://www.youtube.com/shorts/QFN9YvQY9dg

महत्वाच्या बातम्या-

World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!

नांदेड-हैद्राबाद रोडवरील आदमपुर फाटा येथे धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन

Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण