कीर्तनकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल, कोर्टाने दिला आदेश; पण काय आहे कारण?

औरंगाबाद : कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Indorikar Maharaj) यांना बेताल वक्तव्य करणं भोवलं आहे. इंदोरीकर महाराजांनी किर्तनातून लिंगभेदावर भाष्य केलं होतं. सम आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा आणि मुलगी होत असल्याचं इंदोरीकर महाराज म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली. अखेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांच्याबाबत मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढणार आहेत.

प्रकरण काय?
‘सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते,’ असं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. त्याविरोधात अहमदनरगच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.

सत्र न्यायालयानं हा खटला रद्द करण्याचा आदेश दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये इंदुरीकर महाराजांसह सरकारी पक्षालाही प्रतिवादी करण्यात आलं होतं. या कीर्तनाचे व्हीडिओ युट्यूबवर प्रसिद्ध झाले होते. तेच पुरावे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सादर केले होते. हा गुन्हा रद्द करावा म्हणून इंदोरीकर महाराज यांनी सेशन कोर्टात याचिका दाखल केली होती. सेशन कोर्टाने त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला होता. त्यानंतर हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेलं. त्यावर सुनावणई झाली असता कोर्टाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.