१९ वे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन पुण्यनगरीत होणार

पुणे – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद(ABVP) आणि राष्ट्रीय कला मंच आयोजित १९ वे राज्यस्तरीय प्रतिभा संगम पुणे(Pune City) नगरीत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील साहित्य प्रेमाला एक दिशा मिळवून देण्यासाठी अभाविप मागील २५ वर्षांपासून प्रतिभा संगम हा उपक्रम राबवीत आहे. कोरोना च्या(Covid) पार्श्वभूमीवर यात २ वर्ष खंड पडला. मात्र, आता हे १९ वे राज्यस्तरीय प्रतिभा संगम पुणे नगरीत करण्याचे आयोजिले आहे.

दि. १७ मे ला सकाळी ग्रंथ दिंडी होईल, आणि त्यानंतर उद्घाटन, सांस्कृतिक कार्यक्रम, कविता(Poetry), कथा(Story), वैचारिक लेख, पथनाट्य लेखन आदी विषयांचे सादरीकरण व मार्गदर्शन अनुदिनी लेखन होईल. तसेच, काही निवडक प्रतिनिधींचे कविसंमेलन परिचर्चा/अभिवाचन देखील होईल. महाराष्ट्रभरातून विविध विद्यार्थी साहित्यिक या संमेलनात सहभागी होत आहेत. तरी, प्रत्येक रचना प्रकारांमधील सर्वोत्कृष्ट तीन रचनाकारांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येईल.

या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात मुख्य उपस्थिती म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉक्टर अरुणा ढेरे(Doc.Aruna dhere) उपस्थित राहणार आहेत. याच बरोबर, प्रमुख वक्ते म्हणून श्री. सदानंद मोरे(Sadanad More) हे संत साहित्य आणि युवक या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच, प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक श्री. दिक्पाल लांजेकर(Digpal langekar) यांची मुलाखत देखील या ठिकाणी होणार आहे. या प्रतिभा संगमाचे स्वागत समिती अध्यक्ष म्हणून माजी खासदार प्रदीप दादा रावत(Pradeep Rawat) यांची निवड झाली असून स्वागत सचिव म्हणून डॉ. श्रीपाद ढेकणे(Doc. Shreepad Dhekane) यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे हे १९ वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन येणाऱ्या १७ आणि १८ मे ला पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय(Engineering college), शिव दर्शन मार्ग पर्वती पायथा(Shiv Darshan Parvati Paytha,pune), पुणे येथील प्रा. द. मा. मिरासदार साहित्य नगरी पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. याठिकाणी कला क्षेत्रातील अनेक मोठी नावे, साहित्य प्रेमी उपस्थित राहणार असून, कला क्षेत्रात रुची असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या संमेलनात यावे असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सर्व विद्यार्थ्यांना केले आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित पुण्याचे माजी खासदार आणि प्रतिभा संगम स्वागत समितीचे अध्यक्ष प्रदीप दादा रावत यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे या प्रतिभा संगमात स्वागत केले. सोबतच, स्वागत सचिव डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी कशाप्रकारे पुणे नगरीत प्रतिभा संगम होणार आहे याची माहिती दिली. अभाविप पश्चिम महाराष्ट्र कलामंच प्रमुख अनिल म्हस्के(Anil mhaske) यांनी संमेलनाची कार्यक्रम पत्रिका मांडली. तसेच,अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे(Anil thombare) आणि अभाविप पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल(Shubhankar Bachal) यांनी प्रतिभा संगम ची सखोल माहिती व कार्यक्रमाचा आढावा मांडला.