Sanjay Raut | महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही, नमो निर्माण सेना, संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचलं

Sanjay Raut | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या वार्षिक मेळाव्यात ते बोलत होते. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी आपल्या पक्षानं बिनशर्त पाठिंबा देऊ केल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे मनसे महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवणार नाही आणि सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना मदत करणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

मनसेने पाठींबा जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विरोधी पक्षांच्या निशाण्यावर राज ठाकरे आले आहेत. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसेला टोला लगावला आहे.

गेल्या काही काळापासून महाराष्ट्राची अक्षरश: लूट सुरू आहे, खोक्याचं अत्यंत घाणेरडं राजकारण सुरू आहे. त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे आहेत. राज्यातून उद्योग पळवला जातोय, मुंबई तोडण्याचा, मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला जो पक्ष आहे, तोच महाराष्ट्राच्या दुश्मनांना, शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात शंका उत्पन होतात. त्याचीच उत्तर त्यांना (राज ठाकरे) त्यांना द्यावी लागतील. असं काय घडलं की तुम्ही राज्याच्या शत्रूंना पाठिंबा देत आहात, असा प्रश्न लोकं त्यांना विचारतील. तुमचा जो ‘नवनिर्माण पक्ष’ आहे त्याचा ‘नमो निर्माण पक्ष’ का झाला ? त्याची का गरज पडली ? हे राज ठाकरेंनी सांगितलं पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

Ravindra Dhangekar | आघाडीत बिघाडी : पुण्यात शिवसेना उबाठाचा रविंद्र धंगेकरांच्या प्रचाराला ‘जय महाराष्ट्र’

Nana Patole Accident: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा