वयाच्या ५७व्या वर्षी अभिनेते आशिष विद्यार्थी निघाले हनीमूनला, पत्नीसोबतचा फोटो केला शेअर

Ashish Vidyarthi Honeymoon: अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी (Ashish Vidyarthi) गेल्या महिन्यात 25 मे रोजी दुसरे लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. वयाच्या 57व्या वर्षी अभिनेता दुसऱ्यांदा प्रेमात पडला आणि या प्रेमाचे रुपांतर लग्नात केले.

या अभिनेत्याने आसाममधील रुपाली बरुआशी लग्न केले. सोशल मीडियावर दोघांचे फोटोही व्हायरल झाले होते. आता लग्नाच्या एक महिन्याआतच अभिनेता पत्नी रुपालीसोबत हनीमूनला गेला आहे, ज्याची एक झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आशिष आणि रुपाली हनिमूनला निघाले
गेल्या महिन्यात आसामी फॅशन डिझायनर रुपाली बरुआसोबत लग्न करणारा अभिनेता आशिष विद्यार्थी आता हनीमूनला गेला आहे. आशिषने गुरुवारी पत्नी रुपालीसोबतचा स्वतःचा एक नवीन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. फोटोत नवविवाहित जोडपे मनापासून हसताना दिसत आहे. त्याने पोस्टसोबत कॅप्शन लिहिले, ‘प्रिय मित्रा, तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद.. आयुकरण बंधू… अलशुकरण जिंदगी. या सुंदर फोटोसाठी टिनटिनचे आभार.’

आशिष विद्यार्थींच्या या फोटोवर अनेकांनी त्यांना हनीमूनसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी त्यांना ट्रोलही केले आहे. एका चाहत्याने या पोस्टवर कमेंट करताना बहुत आशिक मिझाझ निकले सर आप तो, असे म्हणत आशिष विद्यार्थींची मजा घेतली आहे.