प्रशांत किशोर काँग्रेसच्या उंबरठ्यावरून माघारी फिरले, सोनिया गांधींची ‘ती’ ऑफर नाकारली

नवी दिल्ली – गेल्या आठवड्याभरापासून राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. अखेर या चर्चेला आता दस्तरखुद्द प्रशांत किशोर यांनीच पूर्णविराम दिला आहे. आपण काँग्रेसमध्ये (congress) प्रवेश करणार नसल्याची घोषणाच प्रशांत किशोर यांनी केली आहे.

 

गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत किशोर यांच्या प्रवेशाबद्दल उलटसुलट चर्चा रंगली होती. काँग्रेसमध्येही यावर जोर बैठका घेण्यात आल्या होत्या. पण, आज प्रशांत किशोर यांनी फेसबुक पोस्ट शेअर करून आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या प्रेझेंटेशन आणि चर्चेनंतर, एक अधिकार प्राप्त कृती गट 2024 ची स्थापना काँग्रेसमध्ये करण्यात आली आहे. त्यांना ( प्रशांत किशोर ) परिभाषित जबाबदारीसह गटाचा एक भाग म्हणून पक्षात सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, मात्र त्यांनी नकार दिला. आम्ही त्यांच्या प्रयत्नांचे आणि पक्षाला दिलेल्या सूचनांचे कौतुक करतो, असे ट्विट काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला ( Congress General Secretary Randeep Surjewala ) यांनी मंगळवारी केले.