Avinash Bhosale यांना आज सीबीआय कोर्टात हजर करणार

मुंबई : येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी (Yes Bank-DHFL fraud case) केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केलेले पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांना आज विशेष सीबीआय (CBI) न्यायालयात हजर केलं जाणार आहे. अविनाश भोसले यांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (26 मे) सीबीआयच्या बीकेसी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर सायंकाळी त्यांना अटक करुन चौकशी सुरु करण्यात आली आहे.

30 एप्रिल रोजी अविनाश भोसले यांच्या घरी आणि अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातील 8 ठिकाणी ही छापेमारी झाली होती. व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी (Yes Bank scam case) सीबीआयने अटक केली होती. या अटकेशी संबंधित ही छापेमारी होती. आज त्यांना सीबीआय कोर्टात हजर करुन त्यांची कोठडी मागितली जाणार आहे.