पुण्यात राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का; मोठा जनसंपर्क असलेला युवा नेता शिंदे गटात

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जोरदार इनकमिंग सुरु आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष गणेश सातव (NCP Pune City Vice President Ganesh Satav) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे.(NCP Pune City Vice President Ganesh Satav has joined Balasaheb’s Shiv Sena along with hundreds of workers in the presence of Chief Minister Eknath Shinde.).

२२ जानेवारी रोजी ठाणे येथील हॉटेल टीप टॉप या ठिकाणी हा प्रवेश झाला आहे. गणेश सातव हे मूळचे वाघोली येथील आहेत. दांडगा जनसंपर्क हे सातव यांचं बलस्थान आहे. अशात येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली महापालिका निवडणूक आणि त्यात पुणे महापालिकेत नवीनच समाविष्ट झालेले वाघोली गाव या सगळ्यात एका युवा चेहऱ्याने पक्ष सोडल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी हे प्रवेश घडवून आणले असल्याने पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचा उघड संघर्ष पाहायला मिळणार आहे. आणखी काही बडे नेते देखील राष्ट्रवादीतून शिंदे गट किंवा भाजपमध्ये जाऊ शकतात असे वातावरण तयार झाले आहे.