Chitra Wagh | लोकसभा निवडणुकीत मातृशक्तीची निर्णायक भूमिका असेल, अर्चना पाटलांच्या सभेत चित्रा वाघ यांचे वक्तव्य

Chitra Wagh | ही लढाई विकास पाहिजे की विनाश पाहिजे हे ठरवण्याची आहे, सत्य विरुद्ध असत्य आणि संस्कृतीच्या विरुद्ध विकृती अशी  लढाई आहे. या लोकसभा निवडणुकीत निर्णायक भूमिका जर कोणाची असेल तर ती तुमची आणि माझी म्हणजेच 50% मातृशक्तीची आहे, त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या मतदानाच्या हक्काची पूर्तता करा. मतदान करायला आवर्जून जा, विकासासाठी अर्चना पाटलांना निवडून द्या असे आवाहन भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मतदारांना केले.

धाराशीवच्या लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित महिला मेळाव्यात भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) बोलत होत्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी शौचालया पासून संसदेतील आरक्षणा पर्यंत अनेक गोष्टी दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाक मधून देखील मुक्तता दिली आहे. कॉँग्रेसच्या काळात केवळ मुस्लिम मतदारांची मत जातील म्हणून त्यांनी ट्रिपल तलाक  रद्द करण्याबाबत निर्णय घेतला गेला नाही. मात्र नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम भागिनींची सुद्धा ट्रिपल तलाकच्या जाचातून सुटका केली. त्यामुळे भाजप सरकार मुस्लिम विरोधी किंवा महिला विरोधी आहे, हा प्रचार खोटा असल्याचे दिसून येते.

विकास करायचा असेल तर नरेंद्र मोदी यांच्या शिवाय पर्याय नाही. त्यासाठी अजित पवार यांनी वेगळे होत विकासाची पाऊल वाट नाही तर एक्सप्रेस हायवे धरला आहे. म्हणून आपल्यालाही विकासाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे ही चित्रा वाघ यांनी आवर्जून सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन