मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही; संभाजीराजेंची राज्यसभा निवडणुकीतून अखेर माघार

मुंबई- संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. शिवसेनेने दोन उमेदवार दिल्यामुळे अपक्ष लढणाऱ्या संभजीराजे ( Chatrapati Sambhajiraje ) यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. यातच आज त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली.

शिवसेनेनं (shivsena) माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवली होती, पण मी स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. छत्रपतीला आम्हाला बाजूला ठेवायचे नाही. बरोबर ठेवायचे आहे. त्यामुळे तुम्ही शिवसेनेच प्रवेश करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता असे संभाजीराजे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द पाळला नसल्याचे त्यांनीयावेळी सांगितले तसेच  मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.