शिवसैनिकांनो घाबरू नका, दादागिरीला दादागिरीने उत्तर देऊ – दानवे 

बुलढाणा: शिवसैनिकांना गिनके आणि चुनके मारणारा अजून जन्माला यायचा आहे. दादागिरीला दादागिरीनेच ऊत्तर देणार, असा इशारा विधान शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना दिला आहे.

इथले आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात करोनाचे जंतू कोंबत होते. मग आता तुम्हाला तुमच्या बॅनरवर फडणवीस कसे चालतात?, असा सवाल दानवेंनी गायकवाडांना विचारला. बुलडाण्यात दादागिरी चालते. पण शिवसैनिकांनो घाबरू नका. दादागिरीला दादागिरीने उत्तर देऊ, असेही दानवे म्हणाले.