Babar Azam | ‘पाकिस्तानने फक्त महिलांसोबतच क्रिकेट खेळावे…’ माजी पाक खेळाडूची बाबरच्या संघावर टीका

Babar Azam | टी20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तान संघाची अवस्था अत्यंत वाईट आहे. पाकिस्तानची ही वाईट अवस्था पाहून संघाचा माजी फलंदाज कामरान अकमलने बाबरच्या सेनेला खडसावले आणि म्हटले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानने महिला संघांविरुद्ध खेळले पाहिजे. अकमलचे हे विधान खरोखरच धक्कादायक आहे.

सध्या बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ 2024 च्या टी20 विश्वचषकासाठी अमेरिकेत आहे. पाकिस्तानने स्पर्धेतील पहिले दोन सामने गमावले आहेत. संघाचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध आणि दुसरा भारताविरुद्ध हरला. आता इथून पाकिस्तान सुपर-8 मध्ये पोहोचल्यानंतरही त्यांच्यावर टांगती तलवार कायम आहे.

संघाची ही खराब कामगिरी पाहून कामरान अकमल म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानने पुरुष संघांविरुद्ध खेळणे बंद केले पाहिजे. त्याऐवजी त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या महिला संघांविरुद्ध खेळले पाहिजे. संघ या पातळीपर्यंत खाली आला आहे. पाकिस्तान संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे विश्वचषकाच्या संघात समाविष्ट होण्यासही पात्र नाहीत.” असा खोचक टोला कामरान अकमलने लगावला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप