बाळासाहेबांचे उत्तराधिकारी उद्धव ठाकरेच; बाकी ड्युपलिकेट लोकांचे काम नाही – पेडणेकर

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park) पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि (uddhav thackeray), शिवसेनेला चांगलाच सुनावलं होत. यावर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar ) यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

त्या म्हणाल्या, मुंबईकर पूर्ण ओळखून आहेत. दोन वर्षापासून उद्धवजींच काम सर्व पाहत आहे. यांच्या तर बोलण्याच्या मोऱ्या तुंबल्या. आम्ही तर कामातून विकासाचा धडाका लावला. कोव्हिड कमी होताच लोकार्पण काम सुरू केलं. त्यामुळे उद्वेग आहे. आता काय होणार हे लोकांच्या मनात होते. ते दिसायला लागले.

बाळासाहेबांचे पक्के उत्तराधिकारी उद्धव ठाकरेच आहेत. हे सिद्ध झालं. होतंच. पण लोकांच्या मनात कुठे तरी किंतू परंतु होतं. पण कालच्या राजकारणामुळे लोकांना कळलं. बाळासाहेबांचे सुपूत्रं आणि नातू हेच त्यांचे उत्तराधिकारी आहे. बाकी ड्युपलिकेट लोकांचे काम नाही, असा टोला त्यांनी लगावला.