बिहारच्या या मंदिरात बेल-फूलांपासून बनवली जाते माँ दुर्गेची मुर्ती, जाणून घ्या मंदिराचा इतिहास

Navratri Special: बिहारमध्ये मातेचे असे मंदिर आहे जिथे नवरात्रीमध्ये (Navratri) दररोज माँ जयमंगलाची मूर्ती फुल आणि बेलच्या पानांनी बनविली जाते. पूजा करणाऱ्या स्थानिक लोकांचा दावा आहे की ही मूर्ती जगप्रसिद्ध आहे, कारण संपूर्ण जगात फक्त इथेच देवीला फुले आणि बेलच्या पानांचे रूप दिले जाते. नवरात्रीच्या काळात दुर्गेचे रूप मानल्या जाणाऱ्या माँ जयमंगला देवीला 9 दिवस अशा प्रकारे पूजिले जाते. ही मूर्ती पूर्णपणे नैसर्गिक आहे. या मंदिरातील पूजा गावातील 9 कुटुंबांचे वंशज करतात.

ही पूजा इतर कोठेही होत नाही तर शक्तीपीठ जयमंगलागढपासून 13 किमी अंतरावर असलेल्या चेरिया बरियारपूर ब्लॉकच्या विक्रमपूर गावात केली जाते. नवरात्रीमध्ये जयमंगला मातेची पूजा करण्यासोबतच स्थानिक लोक पर्यावरण रक्षणाचा संदेश देतात. असे म्हणतात की, मातेची मूर्ती बनवण्यासाठी सर्वप्रथम बेलपत्रापासून आकार तयार केला जातो आणि नंतर विविध प्रकारच्या फुलांनी मातेला आकार दिला जातो.

पूजा कधी आणि कशी सुरू झाली?
बर्‍याच स्थानिक तज्ञांनी सांगितले की सुमारे 125 वर्षांपूर्वी जयमंगलागडमधील बलिदानावरून पहासारा आणि बिक्रमपूर गावात संघर्ष झाला होता. दोन्ही गावातील लोक एकमेकांचे कट्टर वैरी झाले होते. त्यानंतर नवरात्रीच्या वेळी बिक्रमपूर गावचे कै. सरयुग सिंहच्या स्वप्नात आई जयमंगला आली होती आणि ती नवरात्रीच्या पहिल्या पूजेपासून नवमी पूजेच्या यज्ञापर्यंत बिक्रमपूर गावात राहणार असल्याचे सांगितले होते. यानंतर ती गडावर परतणार होती.

देवीने स्वप्नातच पूजेची पद्धत सांगितली. फुले व बेलची पाने तोडून धूपचा वापर करून पूजेची पद्धत देवीने सविस्तर सांगितल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून येथे विशेष पद्धतीने पूजा सुरू झाली. आजही त्यांचे वंशज पूजा करतात. त्यामुळे या गावाची श्रद्धा जयमंगला मातेवर कायम असून आजही या गावातील लोक जयमंगलागडावर जाऊन कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी मंदिरात माथा टेकतात.

आईचे रूप 4 ते 5 तासात तयार होते
माँ दुर्गेला रूप देणारे पंकज म्हणाले की, माँ दुर्गेचा आकार तयार करण्यासाठी भक्त आपल्या क्षमतेनुसार देशातील अनेक राज्यांतून फुले आणतात. पंकजच्या म्हणण्यानुसार, देवीला रूप देणारा पुजारी 6 वाजल्यापासून रुप देण्यास सुरुवात करतो आणि 10 वाजता मुर्ती तयार होते.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा