‘बिग बॉस’ फेम मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा भाजपात प्रवेश

मराठी ‘बिग बॉस’ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री मेघा धाडे (Megha Dhade) हिने नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश (Megha Dhade Joins BJP) केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती मेघाने भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षा आणि अभिनेत्री प्रिया बेर्डेही उपस्थित होत्या. भाजप प्रवेशानंतर मेघा धाडेने प्रिया बेर्डेंच्या पाया पडत आशीर्वादही घेतला. याबद्दलची माहिती तिने इंस्टाग्रामद्वारे दिली आहे.

मेघाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या भाजप प्रवेशाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात बावनकुळे मेघाच्या गळ्यात त्यांच्या पक्षाचं चिन्ह असलेली शाल अडकवताना दिसत आहेत. या व्हिडिओत ती प्रिया यांच्याही पाया पडून आशीर्वाद घेताना दिसतेय.